टकळी
हे हाताने सूत कातण्याचे एक छोटेसे यंत्र आहे.याद्वारे वनस्पती,प्राणी किंवा सिंथेटिकचे तंतू यांना पिळ दिल्या जाऊन त्याचा धागा बनतो.याद्वारे सूत तयार करणे ही एक आवडती हस्तकला होती.याद्वारे तयार झालेला धागा हा वस्त्र विणण्यात वापरण्यात येत असे.टकळीला चक्राकृती फिरविल्या जाउन त्याचे टोकास तंतू अडकविल्या जात असे.या तंतूंना पिळ पडून त्याचा धागा तयार होतो.