झोया अख्तर
झोया अख्तर | |
---|---|
जन्म | १४ ऑक्टोबर, १९७२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, लेखिका |
कारकीर्दीचा काळ | १९९९-चालू |
वडील | जावेद अख्तर |
आई | हनी इराणी |
नातेवाईक | फरहान अख्तर (भाऊ) |
झोया अख्तर ( १४ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व लेखिका आहे. आजवर तिने लक बाय चान्स, जिंदगीना मिलेगी दोबारा व गली बॉय ह्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. तिची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे.[१]
चित्रपट यादी
दिग्दर्शक
वर्ष | चित्रपट | पुरस्कार |
---|---|---|
२००९ | लक बाय चान्स | फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार |
२०११ | जिंदगी ना मिलेगी दोबारा | फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार |
२०१५ | दिल धडकने दो |
संदर्भ आणि नोंदी
- ^ 'तलाश'ची कथा सत्य घटनेवर आधारित. 18 मार्च 2017 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील झोया अख्तर चे पान (इंग्लिश मजकूर)