Jump to content

झारखंडचे मुख्यमंत्री

झारखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या झारखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

२००० साली झारखंड बिहार राज्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून आजवर ६ व्यक्ती झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

यादी

पक्ष रंग संकेत
क्रम नाव कार्यकाळ पक्ष[a]
बाबुलाल मरांडी१५ नोव्हेंबर २००० - १७ मार्च २००३
(८५२ दिवस)
भारतीय जनता पक्ष
अर्जुन मुंडा१८ मार्च २००३ - २ मार्च २००५
(७१५ दिवस)
शिबू सोरेन२ मार्च २००५ – १२ मार्च २००५
(१० दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
(२) अर्जुन मुंडा१२ मार्च २००५ – १४ सप्टेंबर २००६
(५५५ दिवस)
भारतीय जनता पक्ष
मधु कोडा१४ सप्टेंबर २००६ – २३ ऑगस्ट २००८[]
(७०९ दिवस)
अपक्ष
(३) शिबू सोरेन२७ ऑगस्ट २००८ – १८ जानेवारी २००९
(१४४ दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
१९ जानेवारी २००९ – २९ डिसेंबर २००९
(३४४ दिवस)
(३) शिबू सोरेन३० डिसेंबर २००९ – ३१ मे २०१०
(१५२ दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
१ जून २०१० – ११ सप्टेंबर २०१०
(१०२ दिवस)
(२) अर्जुन मुंडा११ सप्टेंबर २०१० – १८ जानेवारी २०१३
(८६० दिवस)
भारतीय जनता पक्ष
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
१८ जानेवारी २०१३ – १२ जुलै २०१३
(१७५ दिवस)
हेमंत सोरेन१३ जुलै २०१३ – २८ डिसेंबर २०१४
(५३३ दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
रघुवर दास२८ डिसेंबर २०१४ - २९ डिसेंबर २०१९
(1827 दिवस)
भारतीय जनता पक्ष
(५) हेमंत सोरेन२९ डिसेंबर २०१९ - २ फेब्रुवारी २०२४
(1496 दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
चंपई सोरेन २ फेब्रुवारी २०२४ - ४ जुलै २०२४
(1496 दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा
(५) हेमंत सोरेन४ जुलै २०१९
(216 दिवस)
झारखंड मुक्ति मोर्चा

टीपा

  1. ^ येथे केवळ मुख्यमंत्र्याचा राजकीय पक्ष देण्यात आला आहे.
  2. ^ a b c राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[]

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-25 रोजी पाहिले.
  2. ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.