झांसी
?झांशी / झाँसी / Jhansi (राणी लक्ष्मीबाईंची कर्मभूमी, बुंदेलखंड प्रवेशद्वार) | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | ओरछा |
जिल्हा | झांसी जिल्हा |
भाषा | हिंदी |
कोड • आरटीओ कोड | • युपी/UP |
झांशी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. हे उत्तर प्रदेशच्या अत्यंत दक्षिणेला बेत्रवति नदीच्या काठावर बुंदेलखंड प्रदेशात आहे. झांशी हे झांशी जिल्ह्याचे आणि झांशी विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बुंदेलखंडचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते, झांशी हे पाहुज आणि बेत्रवति नद्यांच्या जवळ आणि आजूबाजूला सरासरी २८५ मीटर (९३५ फूट) उंचीवर वसलेले आहे. हे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीपासून सुमारे 420 किलोमीटर आणि राज्य राजधानी लखनऊपासून 315 किलोमीटर अंतरावर आहे.
१८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झांशीच्या राणीच्या ऐतिहासिक भूमिकेमुळे हे शहर विश्व प्रसिद्ध झाले. म्हणून ह्या शहराला राणी लक्ष्मीबाईंची ऐतिहासिक नगरी असे देखील म्हणतात.
तीन प्रमुख महामार्ग शहरातून जातात - राष्ट्रीय महामार्ग 27, राष्ट्रीय महामार्ग 39 आणि राष्ट्रीय महामार्ग 44.
नेवाळकर राजवंश
नेवाळकर घराणे आणि झांशी राजवंश
- घराणे : नेवालकर घराणे
- साम्राज्य : मराठा साम्राज्य
- कुळ : मराठी कऱ्हाडे ब्राम्हण
- कुलदेवी : श्री महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर
- कुलदेवता : श्री लक्ष्मी पल्लीनाथ रत्नागिरी
- ग्राम देवता : श्री नवलाई माऊली, कोट
- उपासक : महादेव, श्री गणेश
- मुळनिवासी : पावस, राजापूर, रत्नागिरी, महाराष्ट्र
- रहिवासी : कोट रत्नागिरी, पारोळा जळगाव, झांशी
- जहागीरदार : पारोळा, जळगाव, महाराष्ट्र
- संस्थान :- झांशी, बुंदेलखंड, उत्तर प्रदेश
- शासनकाळ : १७६९-१८५८
- मुळपुरुष : रघुनाथ हरी नेवालकर प्रथम
- पहिले सुभेदार : रघुनाथराव हरी हरीपंत नेवालकर द्वि.
- शेवटचे सुभेदार : शिवराव हरीपंत नेवालकर
- पहिले राजा : राजा शिवराव हरीपंत नेवालकर
- शेवटचे राजा : राजा रामचंद्रराव नेवालकर
- पहिले महाराज : महाराज रामचंद्रराव नेवालकर
- शेवटचे महाराज : महाराज गंगाधरराव नेवालकर
- प्रसिद्ध व्यक्ती : झांशीची राणी लक्ष्मीबाई
श्री महाराष्ट्र गणेश मंदिर
- महाराष्ट्र श्री गणपती मंदिर
झांशीच्या ह्या गणेश मंदिरात वैशाख शुक्ल दशमी गुरुवार १९ मे १८४२ रोजी महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचा विवाह झाला होते. हे मंदिर उत्तर भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात सिद्ध मंदिर आहे, त्याचे मान श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई आणि महाराष्ट्रातील दगडूशेठ मंदिराइतके आहे. हे गणपतीचे अति प्राचीन मंदिर आहे. जिथे दर बुधवारी शेकडो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
बरुआ सागर, शिवपुरी, दतिया, ग्वाल्हेर, खजुराहो, महोबा, तोडी फतेहपूर, इत्यादी देखील झांशीजवळील पर्यटन स्थळे आहेत.
श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर हे १८ व्या शतकात झांशीचे सुभेदार रघुनाथराव नेवाळकर द्वितीय यांनी निर्माण केले. हे मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईला समर्पित आहे. महालक्ष्मी अंबाबाई ही नेवाळकरांची कुलस्वामिनी होती. त्यामुळे हे मंदिर बांधले गेले. तसेच रत्नागिरी येथील लक्ष्मीपल्लीनाथ हे नेवाळकरांचे कुलदैवत आहे. लक्ष्मी दरवाजाच्या जवळ असलेल्या ह्या मंदिराला लक्ष्मी मंदिर देखील म्हणतात. तर देवीला लक्ष्मी माता किंवा अंबा माता असे म्हणतात. राजाची कुलदेवी हीच प्रजेची कुलदेवी ह्या नियमाला अनुसरून ही महालक्ष्मी देवी संपूर्ण झांशीकरांची कुलदेवी आहे.
विरांगणा महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्या दररोज सारंगी घोडी वर स्वार होऊन आपल्या पुत्रासह मंदिरात दर्शनासाठी येत असे. आणि दर शुक्रवारी उपवासाच्या दिवशी पालखीत बसून मंदिरात येत असे. मंदिर परिसरात दानधर्म करीत आणि प्रजेला मोतीचूरचे लाडू वाटत असे.
झांशीचे सुभेदार आणि महाराजा
- राजा बिरसिंह देव बुंदेला – १६१३ – झाशीच्या किल्ल्याचा निर्माणकर्ता
- महाराजा छत्रसाल – १७२९-१७४२ च्या सुमारास किल्ला यांच्याकडेच होता.
- नारो शंकर – १७४२-१७५७ – नारो शंकर यांना पेशव्यांनी परत बोलावले.
- माधव गोविंद काकिर्डे , बाबुलाल कन्हई – १७५७-१७६६
- विश्वासराव लक्ष्मण – १७६६-१७६९
- दुसरे रघुनाथराव नेवाळकर – १७६९-१७९५ : हे अतिशय उत्तम असे व्यवस्थापक होते, त्यांनी झाशी संस्थानाचा महसूल वाढवण्यास मदत केली. यांनीच महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले.
- राजा शिवराव नेवाळकर – १७९५ – १८१३
( राणी पद्माबाई साहेब )
- राजा कृष्णराव नेवाळकर
( महाराणी सखुबाई साहेब )
- महाराज रामचंद्रराव नेवाळकर – १८१३ – १८३५
(महाराणी लक्ष्मीबाई साहेब )
- महाराज तिसरे रघुनाथराव नेवाळकर – १८३५ – १८३८ : १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला.
(महाराणी जानकीबाई, लछ्छोबाई बेगम साहिबा )
- महाराजा गंगाधरराव नेवाळकर – १८३८-१८५३ :
( राणी रमाबाईसाहेब, महाराणी लक्ष्मीबाईसाहेब )
- महाराणी लक्ष्मीबाई साहेब : १८५३-१८५४,१८५७-१८५८
(जन्म : १९ नोव्हेंबर १८३५ - १७ जून १८५८) - राणीचा जन्म काशी येथे झाला होता.
वडील - मोरोपंत तांबे; आई : भागिरथीबाई तांबे
माहेरचे नाव : मनकर्णिका तांबे, टोपण नाव : मनू
राणी ४ वर्षाची असताना तिची आई वारली. तिचे वडील बिठूरमध्ये पेशवा न्यायालयात काम करत असत. पेशव्यांनीच नंतर मनूचा सांभाळ केला. तिने लग्नानंतर मुलाला (दामोदरराव) जन्म (१८५१) दिला पण तो जन्मानंतर ४ महिन्यातच मरण पावला. असे म्हणतात की राजा मुलाच्या मृत्यूनंतर परत सावरला नाही आणि २१ नोव्हेंबर १८५३ रोजी त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्ष्मीबाईंनी गंगाधरराव नेवाळकर यांच्या चुलत्याचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले. त्याचे नावही दामोदरराव ठेवण्यात आले. ७ दिवसांच्या युद्धानंतर १० जून १८५७ रोजी राणी लक्ष्मीबाई राज्याभिषेक करून सिंहासनी बसल्या.
- १८५८ -१८६१ : इंग्रज अधिकारी
- १८६१ मध्ये इंग्रजांनी झाशीचा किल्ला आणि शहर जियाजीराव सिंदिया यांच्या हाती दिले.
- १८८६मध्ये इंग्रजांनी झांशी परत घेतले.