झांबिया
झांबिया Republic of Zambia झांबियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "One Zambia, One Nation" | |||||
राष्ट्रगीत: "Stand and Sing of Zambia, Proud and Free" | |||||
झांबियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | लुसाका | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
इतर प्रमुख भाषा | बेम्बा, चेवा | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | एडगर लुंगू | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २४ ऑक्टोबर १९६४ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ७,५२,६१८ किमी२ (३९वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,२९,३५,००० (७१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १६/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २१.८८२ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १,६१० अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.४३० (कमी) (१६४ वा) (२००८) | ||||
राष्ट्रीय चलन | क्वाचा | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी+०२:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ZM | ||||
आंतरजाल प्रत्यय | .zm | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | २६० | ||||
झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला ॲंगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व न्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १८८८ साली सेसिल ऱ्होड्सने येथे खाणकाम करण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली ब्रिटिश सरकारने हा भूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर ऱ्होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. पुढील ५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ ऑक्टोबर १९६४ साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले. केनेथ कोंडा हा स्वतंत्र झांबियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
२०१० सालच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या खाणकामावर अवलंबून आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेला व्हिक्टोरिया धबधबा झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर आहे.
खेळ
- ऑलिंपिक खेळात झांबिया
- झांबिया फुटबॉल संघ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- झांबियाचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील झांबिया पर्यटन गाईड (इंग्रजी)