झडत्या
पोळा सणात बैल/नंदी साठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात
झडत्या गीतांची उदाहरणे
गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी, एस नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
बळी रे बळी लिंब बनी
अशी कथा सांगेल कोणी
राम-लक्ष्मण गेले हो वनी
राम-लक्ष्मणाने आणली वनफुले
ते दिले महादेव पारबतीच्या हाती
तीनशे साठ नंदी
एक नमन गौरा.. महादेव..!