झटकजमाव
जे लोक अचानक एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटतात, आणि थोड्या वेळात मुद्याला सोडून विचित्रशा गप्पा मारून निघून जातात, अशा लोकांच्या जमावाला झटकजमाव (इंग्रजी:Flash Mob) असे म्हणतात. झटकजमाव हे दूरध्वनी, सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल) द्वारा आमंत्रित केले जातात. कोणत्याही राजकीय (उदा.जाहीर निषेध) वा व्यावसायिक जाहिराती, प्रचार मोहिमा, जनसंपर्क उद्योग किंवा पगारी व्यवसायिक यांच्यासाठी असा जमाव जमत नाही. आज आपण ज्या झटकजमाव संकल्पनेचा उल्लेख करतो त्याचा पहिला संदर्भ २००३ मध्ये वासीकच्या घटनेनंतर प्रसारित झलेल्या ब्लॉगमध्ये आहे. हुशारजमाव या मूळ संकल्पनेतून झटकजमाव सुरू झाले.[ संदर्भ हवा ]
८ जुलै २००४ला प्रकाशित झालेल्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत झटकजमावच्या अर्थामध्ये "मुद्याला सोडून विचित्रशा गप्पा" असा उल्लेख करण्यात आला होता. हा उल्लेख कला प्रदर्शने, निषेधसभा आणि संमेलनांपेक्षा वेगळा होता. "असे लोक जे इंटरनेटद्वारा पटकन संघटित होऊन सार्वजनिक ठिकाणी भेटतात आणि काहीतरी विचित्र करून निघून जातात असा" वेबस्टर शब्दकोशामध्ये दिलेला झटकजमावचा अर्थ हा मूळ व्याख्येशी सुसंगत आहे. परंतु पत्रकारांनी आणि जाहिरातदारानी राजकीय निषेध, संघटित इंटरनेट हल्ला, संघटित प्रदर्शन आणि पॉप संगीतकारांच्या प्रचार मोहिमा यांसाठी झटकजमाव हा शब्द वापरला.[ संदर्भ हवा ]
इंटरनेटद्वारे एकत्रित आलेले जे व्यापारी एकमेकांशी घासघीस करत हुज्जत घालतात अशा चीनमधील दुकानदारांच्या संघटनांसाठीसुद्धा झटकजमाव या संकल्पनेचा वापर पत्रकारांकडून केला जातो. भारतामध्येसुद्धा शेअर मार्केट, काॅटन मार्केट, तेल किंवा तेलबिया मार्केट वगैरेंच्या परिसरात वेळीअवेळी असेे जमाव जमतात आणि बोली लावतात.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
- मुंबईतले झटकजमाव (मराठी मजकूर)