Jump to content

झकॅरी टेलर

झकॅरी टेलर

सही झकॅरी टेलरयांची सही

झकॅरी टेलर (इंग्लिश: Zachary Taylor ;) (२४ नोव्हेंबर, इ.स. १७८४ – ९ जुलै, इ.स. १८५०)हा अमेरिकेचा बारावा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी सेनाधिकारी होता. सुरुवातीस राजकारणात रस नसलेला टेलर इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला व लुईस कास याला हरवत अध्यक्षपदी निवडला गेला. ४ मार्च, इ.स. १८४९ ते ९ जुलै, इ.स. १८५० या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले.

अमेरिकी सैन्यातल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत टेलर इ.स. १८१२ चेयुद्ध, ब्लॅक हॉक युद्ध व दुसरे सेमिनोल युद्ध, या युद्धांत लढला होता. मेक्सिकन-अमेरिकन युद्धात पालो आल्टो व मॉंटेरीच्या लढायांमध्ये नेतृत्व करत त्याने अमेरिकी सैन्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. टेलराने ाअपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत न्यू मेक्सिकोकॅलिफोर्निया येथील रहिवाश्यांना प्रादेशिक अधिमान्यता मिळवण्याऐवजी आपापल्या राज्यघटना बनवून संस्थान म्हणून अधिमान्यता मिळवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले व दक्षिणेकडील गुलामी-समर्थक राज्यांचा रोष पत्करला. या घडामोडीतूनच पुढे इ.स. १८५०ची तडजोड घडून आली.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "झकॅरी टेलर: अ रिसोर्स गाइड (झकॅरी टेलर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)