झंझ
महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सनाच्या ९१०-९३० या काळात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शंकराचा भक्त होता. त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती अशी :-
- कडवा नदीकिनारी असणाऱ्या टाकेद येथील शिवालय.
- कुकडी नदीजवळ असणारे कुकडेश्वर.
- कोटेश्वर, भोरगिरी किल्ला
- घोड नदीवरील वचपे येथील सिद्धेश्वराचे देऊळ.
- त्र्यंबकेश्वर येथे अहिल्यातीर्थाजवळ असणारे भग्न शिवमंदिर.
- धारणा नदीच्या तीरावरील तऱ्हले येथील शिवालय.
- प्रवरा नदीकिनारी असणारे, रतनगडच्या पायथ्याचे रतनवाडी येथील अमृतेश्वर.
- बाम नदीकिनारी असणाऱ्या बेळगाव या गावामधील पुरातन शिवालय.
- मीना नदीवरील पारुंडे या गावातले ब्रम्हनाथ मंदिर.
- मुळा आणि पुष्पावती या दोन नद्यांच्या दरम्यान खिरेश्वर या गावातील सुप्रसिद्ध नागेश्वर. (ही मुळा नदी अहमदनगर जिल्ह्यातली नदी आहे, पुण्यातली मुळा नाही)
- वाकी नदीच्या उगमस्थानावर (इगतपुरी) येथे असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याचे शंकराचे शिवालय.
- जिथून मंगलगंगा नदी उगम पावते, तेथील.हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड