ज्योर्दानो ब्रुनो
ज्योर्दानो ब्रुनो Giordano Bruno (इटालियन) | |
---|---|
जन्म | इ.स. १५४८ नोला, नेपल्सचे राजतंत्र (आजचा इटली) |
मृत्यू | १७ फेब्रुवारी, इ.स. १६०० रोम |
नागरिकत्व | इटालियन |
कारकिर्दीचा काळ | रानिसां |
ज्योर्दानो ब्रुनो (इटालियन: Giordano Bruno) (इ.स. १५४८ - १७ फेब्रुवारी, इ.स. १६००) हा रानिसां काळातील एक इटलियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.
इ.स. १६०० साली कॅथलिक चर्च, येशू ख्रिस्त व ट्रिनिटीबाबत चुकीची मते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यावरून त्याला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १७ फेब्रुवारी १६०० रोजी ब्रुनोला जिवंत जाळून टाकण्यात आले.
बाह्य दुवे
- "ब्रुनोच्या निर्मिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "ब्रुनोचे लिखाण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)