Jump to content

ज्योत्स्ना देवधर

ज्योत्स्ना देवधर
जन्म २७ फेब्रुवारी, इ.स. १९२६ []
जोधपूर, राजस्थान, भारत
मृत्यू १७ जानेवारी, इ.स. २०१३
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी

ज्योत्स्ना देवधर (जन्म : जोधपूर, २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६[], - पुणे, १७ जानेवारी, इ.स. २०१३) ह्या मराठी तसेच हिंदी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिका होत्या.

ज्योत्स्ना देवधर यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर वर्धा येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या.

लेखन

ज्योत्स्ना देवधर यांनी ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून त्यांनी साहित्य लेखनास सुरुवात केली. ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली.

ज्योत्स्ना देवधर यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दुःखे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.[]

त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे.

त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि इस्लामिया विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्लिश भाषेत अनुवाद झाले आहेत.

ज्योत्स्ना देवधर या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या होत्या.[]

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अटकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
अंतराहिंदी कथासंग्रह
आकाशीसायली प्रकाशन
आक्रीतनवचैतन्य प्रकाशन
आजीची छडी गोड गोडबालवाङ्‌मय
आठवणींचे चतकोरललितसायली प्रकाशन
आंधळी कोशिंबीरकथासंग्रहनवचैतन्य
उणे एककादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
उत्तरयोगी(योगी अरविंद यांच्या जीवनावरील) कादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
उणे एककादंबरी
उद्ध्वस्तकथासंग्रहदिलीपराज
एक अध्यायकादंबरी
एक श्वास आणखीकादंबरीनंदादीप
एरियल आकाशवाणीचा रंजक इतिहासआत्मकथनमेनका
कॅक्टसहिंदी कथासंग्रह
कडेलोटकादंबरी
कल्याणी हिंदी व मराठीकादंबरीपॉप्युलर
कल्याणीनाटकपॉप्युलर
काळजीऐतिहासिकनवचैतन्य
कुॅंवरनीहिंदी कादंबरीनंदादीप
घरगंगेच्या काठीकादंबरीपॉप्युलर
गजगेकथासंग्रह
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्याकथासंग्रह
चुकामूककादंबरी
चेहरा आणि चेहरेललितनवचैतन्य प्रकाशन
झरोकाकथासंग्रह
तेजस्विनीबाल वाङमयनवचैतन्य प्रकाशन
दंवबिंदूकथासंग्रहश्रीकल्प प्रकाशन
दीर्घाकथासंग्रहदीपरेखा प्रकाशन
धुम्मसहिंदी कथासंग्रह
निर्णयनाटकनीलकंठ प्रकाशन
निवडक ज्योत्स्ना देवधरसायली प्रकाशन
निवान्तकथासंग्रहदिलीपराज
पडझडकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
पांघरुणकथा संग्रहसायली प्रकाशन२००९
पुतळाकादंबरी
फिलरकथासंग्रह
बुटक्या सावल्याकादंबरी
बोंचकथासंग्रहअभिनंदन प्रकाशन
मधली भिंतकथा संग्रहपायल पब्लिकेशन्स
मावळतीललित
मिसफिटकथासंग्रह
मूठभर माणुसकीललितनवचैतन्य प्रकाशन
याचि जन्मीनवचैतन्य प्रकाशन
यामिनीकथाअनुवादित, कथासंग्रहनवचैतन्य
रमाबाईचरित्रपॉप्युलर प्रकाशन२००८
रमा बाई(हिंदी)चरित्रलोकभारती प्रकाशन१९९६
विंझणवाराकथा संग्रहअक्षताफेब्रु. २००९
समासकथासंग्रहमॅजेस्टिक प्रकाशन
सात घरांच्या सीमारेषाकथासंग्रहदिलीपराज
सायलीकथासंग्रह
हो नाहीच्या उंबरठ्यावरकादंबरीपायल पब्लिकेशन्स

पटकथा आणि संवादलेखन

  • ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटासाठी
  • ‘कल्याणी’ या दूरचित्रवाणीमालिकेसाठी
  • ‘पडझड’ या दूरचित्रवाणी मालेकेसाठी.

ज्योत्स्ना देवधर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • घर गंगेच्या काठी या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा हरी नारायण आपटे पुरस्कार.
  • कॅक्टस हा हिंदी कथासंग्रह, निर्णय हे पुरुषपात्रविरहित मराठी नाटक आणि ‘रमाबाई’ ही मराठी कादंबरी या त्यांच्या साहित्यकृती पुरस्कारप्राप्त ठरल्या.
  • महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे मराठी ग्रंथालय यांचा ‘ज्येष्ठ लेखिका सन्मान’.
  • अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनतर्फे ‘भाषाभूषण’ ही पदवी
  • महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे ‘कल्याणी’ या हिंदी नाटकास ‘विष्णूदास भावे पुरस्कार’.
  • कराड येथे १९७५ मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद.
  • अंबाजोगाई येथील भरलेल्या जिल्हा महिला परिषदेचे अध्यक्षपद.
  • महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सभासदत्व.
  • महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार निवड समितीवर सभासद म्हणून निवड.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र चटर्जी पुरस्कार. []

संदर्भ

  1. ^ a b दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. ७०.
  2. ^ "मनसे.ऑर्ग". 2011-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.
  3. ^ "साहित्यप्रेमी भगिनी मंडळ". 2009-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.
  4. ^ ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत शरदबाबू पुरस्कार[permanent dead link]

बाह्य दुवे