Jump to content

ज्योती व्यंकटाचलम

Jothi Venkatachalam (sl); جوتھی وینکٹاچلم (ur); Jothi Venkatachalam (fr); ज्योती व्यंकटाचलम (mr); Jothi Venkatachalam (es); Jothi Venkatachalam (ast); ജ്യോതി വെങ്കിടാചലം (ml); Jothi Venkatachalam (nl); Jothi Venkatachalam (ca); Jothi Venkatachalam (yo); ᱡᱳᱛᱷᱤ ᱵᱷᱮᱱᱠᱟᱴᱟᱪᱟᱞᱟᱢ (sat); Jothi Venkatachalam (en); Jothi Venkatachalam (ga); Jothi Venkatachalam (de); ज्योति वेंकटचलम (hi); ஜோதி வெங்கடாசலம் (ta) política india (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); femme politique indienne (fr); India poliitik (et); politikari indiarra (eu); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política india (ast); política índia (ca); Indian politician (en); Indian politician (en-gb); política indiana (pt); politikane indiane (sq); سیاستمدار هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); سياسية هندية (ar); Indian politician (en); politica indiana (it); indisk politiker (sv); indisk politikar (nn); פוליטיקאית הודית (he); Indiaas politica (nl); індійський політик (uk); കേരളത്തിലെ ആദ്യ വനിതാ ഗവർണർ (ml); కేరళ గవర్నరుగా, తమిళనాడు మంత్రిగా పనిచేసిన రాజకీయ నాయకురాలు (te); indisk politiker (da); política india (gl); Indian politician (en-ca); polaiteoir Indiach (ga); இந்திய தேசிய காங்கிரஸ் அரசியல்வாதி (ta) ஜோதி வெங்கடாச்சலம் (ta)
ज्योती व्यंकटाचलम 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर २७, इ.स. १९१७
पीयिन ओ लविन
मृत्यू तारीखनोव्हेंबर २८, इ.स. १९९२
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Governor of Kerala (इ.स. १९७७ – इ.स. १९८२)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ज्योथी व्यंकटचलम या एक भारतीय राजकारणी होत्या ज्यांनी केरळचे राज्यपाल आणि तामिळनाडूच्या विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले होते.

आयुष्य आणि कार्यकाळ

ज्योथी व्यंकटचलम यांचा जन्म ब्रिटिश बर्मा (आता म्यानमार) मधील मायम्यो येथे २७ ऑक्टोबर १९१७ रोजी जी. कुप्पुरम आणि मीनापाई यांच्या घरी झाला.  त्यांच्या वडिलांची ब्रिटिश बर्माच्या सचिव कार्यालयात काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. बर्मामधील राजकीय गोंधळामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि १९३० मध्ये चेन्नईला परत आले. ज्योथीयांनी इवर्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल, वेपेरी, चेन्नई, तमिळनाडू येथे तिचा अभ्यास सुरू ठेवला. 

ज्योथी ह्या सामाजिक कार्यात जास्त गुंतल्या आणि काँग्रेस पक्षाच्या नजरेत आल्या. १० ऑक्टोबर १९५३ ते १२ एप्रिल १९५४ दरम्यान सी. राजगोपालाचारी मंत्रिमंडळात त्यांना दारूबंदी आणि महिला कल्याण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे ज्योथी या भारताच्या प्रजासत्ताकातील तामिळनाडू राज्यात मंत्री झालेल्या पहिल्या महिला ठरल्या. [] त्या अल्पशा कार्यकाळात त्यांनी दारूबंदी विभागाला पोलीस विभागाशी जोडले.

नंतर १९६२ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आणि १९७१ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) उमेदवार म्हणून एग्मोर मतदारसंघातून त्या तामिळनाडू विधानसभेत निवडून आल्या.[] [] यावेळी मुख्यमंत्री के. कामराज यांनी १९६२ पासून सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि १९६७ पर्यंत एम. भक्तवतचलम यांच्या मंत्रालयात त्या कार्यरत राहिल्या. [] [] []

नंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९७७ ते २६ ऑक्टोबर १९८२ पर्यंत केरळच्या राज्यपाल म्हणून काम केले. []

१९७४ मध्ये यांना सार्वजनिक व्यवहाराच्या क्षेत्रात समर्पित योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

१९ जुलै १९६१ रोजी त्यांच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ज्योथी व्यंकटचलम यांचेही निधन झाले आहे. []

संदर्भ

  1. ^ முதல் பெண்கள் - ஜோதி வெங்கடாசலம். Vikatan. 2020.
  2. ^ 1962 Madras State Election Results, Election Commission of India
  3. ^ 1971 Tamil Nadu Election Results, Election Commission of India
  4. ^ Kandaswamy. P (2008). The political Career of K. Kamaraj. Concept Publishing Company. pp. 62–64. ISBN 8170228018.
  5. ^ The Madras Legislative Assembly, Third Assembly I Session
  6. ^ The Madras Legislative Assembly, Third Assembly II Session
  7. ^ "Governors of Kerala". 13 August 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 January 2010 रोजी पाहिले.
  8. ^ Trailblazers from another era