ज्युलियस सीझर
ज्यूलिअस सीझर | ||
---|---|---|
रोमन साम्राज्याचा संस्थापक | ||
अधिकारकाळ | ऑक्टोबर, इ.स.पू. ४९ ते १५ मार्च, इ.स.पू. ४४ | |
पूर्ण नाव | गैयस ज्यूलिअस सीझर | |
जन्म | जुलै, इ.स.पू. १०० | |
सुबुरा, रोम | ||
मृत्यू | १५ मार्च, इ.स.पू. ४४ | |
क्यूरिआ ऑफ पॉंपेई, रोम | ||
वडील | गैयस ज्युलियस सीझर द एल्डर | |
आई | औरेलिआ कॉट्टा | |
पत्नी | कॉर्नेलिना सिन्ना मायनर | |
इतर पत्नी | पॉंपेईआ कॅलपर्निआ पिझोनीस क्लिओपात्रा ७ फिलोपातोर |
गैयस ज्युलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमन प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता.
याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस ज्युलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी ज्युलियस) असे ठेवून घेतले.