ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो. या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो.
शासनाचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर रामदास जोशी यांना प्रदान झाला. शासनाचा 2020 सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ह.भ.प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे.
ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
- डाॅ, उषा देशमुख
- डॉ किसन महाराज साखरे
- जगन्नाथ महाराज नाशिककर
- डॉ. दादा महाराज मनमाडकर
- ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
- मधुकर रामदास जोशी
- मारोती महाराज कुऱ्हेकर
- डॉ. यू.म. पठाण
- रा.चिं. ढेरे
- रामकृष्ण महाराज लवितकर
- प्राचार्य रामदास डांगे
- डॉ. नारायण महाराज जाधव