ज्ञानभाषा
ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो.
"हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. " [१]
इतिहास आणि प्रयत्न
पारतंत्र्यामुळे भारतासारख्या काही देशांवर परभाषा लादली गेली. व मध्यंतरीच्या काळात देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली.भारतातच इंग्रजी जाणणारा वर्ग इंडिया आणि इंग्रजी न जाणणारा भारत अशी वर्गवारी केली जाऊ लागली. इंग्रजी हे अर्थार्जनाचे मुख्य साधन बनल्यामुळे तिचा ज्ञानभाषा म्हणून स्विकार वाढत आहे.
आता भाषांतर–प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेला ज्ञानाविज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषांमधून ग्रंथनिर्मिती करावी लागणार आहे
केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठीसुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.
शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.
या अनुरोधाने महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांची एक संयुक्त बैठक होऊन त्यात पदव्युत्तर स्तरापर्यंत शास्त्रीय व तांत्रिक विषय धरून सर्व विषयांची परिभाषा शासनाने तयार करावी असे ठरले.[२]
कार्यरत संस्था
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ ११ सप्टे १२ वाजता मनोगतसंकेतस्थळावरून ले. गोविंद तळवलकर
- ^ (-'चेतना प्रधान' (विभागीय साहाय्यक संचालक), भाषा संचालनालय यांनी आपला हा निबंध "कोश वाङमय - ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन" या ऐक्यभारती संशोधन संस्था आणि पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयूक्तपणे आयोजित कार्यशाळेत दिनांक १७ जानेवारी रविवार २०१० रोजी वाचला गेला.सभेतच हा निबंध प्रताधिकार मुक्त स्वरूपात आंतरजालावर प्रसिद्धीस उपलब्ध करावा अशी विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली.मराठी टंकलेखीत मुद्रणाची आवृत्ती विजय पाध्ये यांनी utf8 यूनिकोडीत केली आंतरजालीय व इतरत्र मुक्त प्रकाशनास मान्यता पुन्हा एकदा नक्की केल्याचे कळविले.)