जो जीता वही सिकंदर
जो जीता वही सिकंदर | |
---|---|
दिग्दर्शन | मन्सूर खान |
निर्मिती | नासिर हुसेन |
प्रमुख कलाकार | आमिर खान आयेशा झुल्का दीपक तिजोरी |
गीते | मजरूह सुलतानपुरी |
संगीत | जतिन-ललित |
भाषा | [[हिंदी [१] भाषा|हिंदी [१]]] |
प्रदर्शित | २२ मे १९९२ |
अवधी | १७६ मिनिटे |
जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन आणि सह-लेखन मन्सूर खान यांनी केले आणि नासिर यांनी निर्मिती तसेच सह-लेखन केले होते. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात आयेशा झुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी, मामिक सिंग आणि कुलभूषण खरबंदा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात संगीत जतिन-ललित यांचे आहे.
चित्रपटाची कथा देहरादून येथील काही कॉलेजच्या मुलांमधील चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्रपटामधील उदित नारायण व साधना सरगमने गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. हा चित्रपट १९७९ च्या अमेरिकन चित्रपट ब्रेकिंग अवेवर आधारित आहे.[२]
भूमिका
- आमिर खान
- आयेशा झुल्का
- मामिक
- कुलभुषण खरबंदा
- पूजा बेदी
- अजित वाच्छानी
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
संदर्भ
- ^ http://cbfcindia.gov.in/html/SearchDetails.aspx?mid=64402&Loc=Backlog [मृत दुवा]
- ^ "We list down 7 Bollywood films inspired from Hollywood". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील जो जीता वही सिकंदर चे पान (इंग्लिश मजकूर)