जोसेफ बायडेन, जुनियर
जो बायडेन Joe Biden | |
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती | |
कार्यकाळ २० जानेवारी, २०२१ – विद्यमान | |
उपराष्ट्रपती | कमला हॅरिस |
---|---|
मागील | डॉनल्ड ट्रम्प |
पुढील | विद्यमान |
अमेरिकेचे ४७ वे उपराष्ट्रपती अमेरिका | |
कार्यकाळ २० जानेवारी, २००९ – २० जानेवारी २०१७ | |
राष्ट्राध्यक्ष | बराक ओबामा |
मागील | डिक चेनी |
पुढील | माइक पेन्स |
कार्यकाळ ३ जानेवारी १९७३ – १५ जानेवारी २००९ | |
जन्म | २० नोव्हेंबर, १९४२ स्क्रॅंटन, पेन्सिल्व्हेनिया |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक |
आई | कॅथरीन आयुगेनिया फिगेन |
वडील | जो राॅ. बायडेन |
पत्नी | जिल जेकब्ज |
अपत्ये | * बेऊ
|
गुरुकुल | * डेलवर विद्यापिठ (बी.ए.)
|
व्यवसाय | राजकारण |
सही | |
संकेतस्थळ | * https://joebiden.com/presidency-for-all-americans/ |
जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette "Joe" Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले.
बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले.
जीवनचरित्र
शिक्षण
बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. १९६८ मध्ये त्यांनी सिरॅक्यूझ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९७२ च्या निवडणुकींमध्ये बायडेन यांनी डेलावेर मधून सेनेटची निवडणूक जिंकली.
राजकीय कारकीर्द
उपराष्ट्रपतीपदीचा कार्यकाळ
बाह्य दुवे
- अधिकृत व्यक्तिचित्र Archived 2013-07-18 at the Wayback Machine.
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ६, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)