जोधा अकबर
जोधा अकबर | |
---|---|
जोधा अकबर | |
कथा | आशुतोष गोवारीकर |
पटकथा | आशुतोश गोवारीकर |
प्रमुख कलाकार | हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, सोनू सूद, इला अरुण, कुलभूषण खरबंदा |
संगीत | ए.आर. रहमान |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १५ फेब्रुवारी २००८ |
अवधी | २१४ मिनिटे |
निर्मिती खर्च | ४० कोटी |
एकूण उत्पन्न | १.१२ अब्ज |
जोधा अकबर हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशन व ऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्य चित्रपटाची कथा मुघल सम्राट अकबर व हिंदू राजपूत युवराज्ञी जोधाबाई ह्यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. जोधा अकबरच्या निर्मितीसाठी गोवारीकर चमूने अनेक इतिहासकारांची मदत घेऊन मोठ्या प्रमाणावर संशोधन केले होते. ह्या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात कर्जत येथे झाली. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत देखील हिट झाले.
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर
- सर्वोत्तम अभिनेता - हृतिक रोशन
- सर्वोत्तम गीतकार - जावेद अख्तर
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-05-12 at the Wayback Machine.
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील जोधा अकबर चे पान (इंग्लिश मजकूर)