जोडशहरे
शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-
- एर्नाकुलम-कोचीन (केरळ)
- असनसोल-दुर्गापूर
- अहमदाबाद-गांधीनगर (गुजरात)
- अलाहाबाद-नैनी (उत्तरप्रदेश)
- कटक-भुवनेश्वर
- कोलकता-हावडा (बंगाल)
- कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
- कांक्रोली-राजसमंद
- कांडला-गांधीधाम
- कुळगांव-बदलापूर-अंबरनाथ (महाराष्ट्र)
- जलपैगुरी-सिलिगुरी (बंगाल)
- तिरुचिरापल्ली-श्रीरंगम् (तामिळानाडू)
- तिरुनेलवेली-पलायमकोट्टाई (तामिळनाडू)
- त्रिवेंद्रम-थुंबा (केरळ)
- दिल्ली-नॉयडा-नवी दिल्ली
- दुर्ग-भिलाई
- नवघर-माणिकपूर (महाराष्ट्र)
- नांदेड-वाघाळा (महाराष्ट्र)
- नाशिक-ओझर (महाराष्ट्र)
- पुणे-पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
- शिवामोगा-भद्रावती
- भिवंडी-निजामपूर (महाराष्ट्र)
- मिरा-भाईंदर (महाराष्ट्र)
- मुंबई-नवी मुंबई (महाराष्ट्र)
- रांची-हाटिया (झारखंड)
- वसई-विरार (महाराष्ट्र)
- विजयवाडा-अमरावती (आंध्रप्रदेश)
- विशाखापट्टणम-वॉल्टेअर (आंध्रप्रदेश)
- शिवामोगा-भद्रावती
- सांगली-मिरज-कुपवाड (महाराष्ट्र)
- सिकंदराबाद-हैदराबाद-कांचीगुडा (तेलंगण)
- हरिहर-देवगिरी
- हुबळी-धारवाड (कर्नाटक)