जोडपरळी
?जोडपरळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | परभणी |
जिल्हा | परभणी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
जोडपरळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
जोडपरळी
परभणी जिल्ह्यापासून 36 किलोमीटर अंतरावर जोडपरळी हे गाव वसलेले आहे.
शैक्षणिक माहिती...
जोडपरळी या गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत आहे.तसेच गावात दोन अंगणवाड्या आहेत.
मंदिरे...
जोडपरळी या गावात उत्तर दिशेला दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे.तसेच गावात देवीचे मंदिर आहे.महानुभाव पंथातील श्री दत्तात्रय स्वामींचा मठ आहे.तसेच गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बौद्ध यांचा पुतळा आहे.जोडपरळी या गावात 3000 लोकसंख्या असून येथे मराठा,ब्राह्मण,सुतार सोनार,बौद्ध,मातंग,कोळी,ना व्ही इत्यादी जातींचे लोक राहतात.
प्रामुख्याने जोडपरळी या गावातील 55% लोकांचे आडनाव काळे आहे.व 40% लोकांचे आडनाव राऊत आहे. तसेच गावात कदम, रासवे,सूर्वसे, लोणकर,लांडगे,सुगंधे,बेकटे, साळवे,गायकवाड,विभुते, पडोळे,,भालेराव,कदम, गरूड या आडनावाचे लोक राहतात.
जोडपरळी या गावात पूर्णा नदी उत्तरेकडून आली असून ती पूर्वेकडून दक्षिणेकडे वळसा घालत जाते.
या गावात 4-5 विहीरी तसेच बोअरवेल देखील आहेत.
व्यवसायः
या गावातील लोकाची बाजारपेठ परभणी तसेच जवळा बाजार येथे भरते.या गावात टाळकी ज्वारी,गहू,कापूस,तुर, सोयाबीन,हरभरा,या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
जोडपरळी या गावात एस टी महामंडळ दोन वेळेस येते.
या गावातील सरपंच आंबादास काळे.तसेच पोलीस पाटील दिगंबर काळे हे आहेत.
जोडपरळी या गावात ग्रामपंचायत आहे.
जोडपरळी या गावातील लोक एकमेकांसोबत आनंदाने सामंजस्याने राहतात.
परभणी जिल्ह्याचा पिन कोड 431401 हा आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.