Jump to content

जोगोवा सेवा समिती

जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.[] २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा शब्द जोशी, गोंधळीवासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून घेण्यात आला आहे.

नांदेड, ठाणे, औरंगाबाद, वाळुजपंढरपूर, जालना, जाफ्राबाद, खासगाव इ. ठिकाणी या संघटनेच्या शाखा आहेत.[][]

इतिहास व उद्देश

७ जून २०१४ रोजी ही संघटना नांदेड येथे स्थापन करण्यात आली. जोगोवा सेवा समितीने जोशी, गोंधळी व वासुदेव हे तिन्ही समाज एक छताखाली आणले. माणिकरावजी रेनकेसाहेब व इतर समाजातील २ जणांनी या एकत्रित होऊन आपल्या भिक्षेकरी समाजासाठी ही समिती स्थापन केली. समाजातील शैक्षणिक व समाजातील समाज बांधवांना एकत्रित राहून काम करण्याची विचारधारा मांडली. महाराष्ट्रात आपल्या समाजाला शासनातील योजनांत व लोककलावंतांना आकाशवाणी केंद्रांवर प्रोत्साहन मिळून मानधन मिळावे. समाजावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून जोगोवा सेवा समिती महाराष्ट्र राज्यात काम करत आहे.

उद्देश

  1. समाजातील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मेळावे, परिषद, कार्यशाळा, अधिवेशन इ.आयोजित करणे.
  2. समाजातील समस्या, दारिद्रय, मागासलेपणा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे.
  3. समाजातील समाजिक राजकीय आर्थिक व सांस्कृतिक समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे.

संदर्भ

  1. ^ आनंद नगरी वृत्तपत्र, दि. १५-११-२०१८, पत्रकार - अनिल जाधव
  2. ^ दैनिक आनंद नगरी वृत्तपत्र दि.२ डिसेंबर २०१८ पान क्र.२
  3. ^ दैनिक दुनियादारी वृत्तपत्र; पान क्र. १; दि. १८ नोव्हेंबर २०१८