Jump to content

जोइता मंडल

जोइता मंडल ह्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश व पश्चिम बंगालमधील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

सुरुवातीचे जीवन

जोइता मंडल यांचे सुरुवातीचे जीवन खूप हलाखीचे होते. बालपणी त्यांना घराच्यांची उपेक्षा सहन करावी लागत असे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरही त्यांना उपेक्षित वागणूक मिळत असे म्हणून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही सोडून दिले. २००९ मध्ये त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बस स्थानक व रेल्वे स्थानकावर झोपून रात्री काढल्या.त्यांना विश्रांतीगुहासारख्या सुविधांपासूनही वंचित रहावे लागले. आर्थिक समस्येमुळे भीकही मागितली. घर सोडल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी नोकरीहि केली, पण तिथेही त्यांना अपमानकारक वागणूक मिळाल्याने त्यांनी ती नोकरीही सोडून दिली.[]

कारकीर्द

घर सोडल्यानंतर त्या किन्नरांच्या वस्तीमध्ये जाऊन राहू लागल्या व त्याच्या समूहासह नाच-गाण्याचे कार्यक्रम करू लागल्या. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी दिनाजपुर येथे किन्नरांचा हक्कासाठी काम करणारी एक संस्था स्थापन केली. तसेच रेड लाईट भागामध्ये राहणाऱ्या महिलांना आधार कार्ड, रेशनकार्ड दिले. त्या महिलांचा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन ही दिले. त्यानंतर वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू केले. त्यांचे हे कार्य पाहून पश्चिम बंगाल सरकारने जुलै २०१७ मध्ये लोक न्यायालय न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे त्या देशाचा पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश बनल्या.[]

संदर्भ

  1. ^ "एक किन्नर के जज बनने की Inspirational कहानी– News18 हिंदी". News18 India. 2018-09-10 रोजी पाहिले.
  2. ^ "इस किन्नर को सलाम करते हैं अफसर, कभी फुटपाथ पर सोकर गुजारी थी रातें". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-09-10 रोजी पाहिले.