Jump to content

जॉर्ज हर्बर्ट

जॉर्ज हर्बर्ट (एप्रिल ३, इ.स. १५९३:मॉंटगोमरी, वेल्स - मार्च १, इ.स. १६३३) हा वेल्समधील कवी, वक्ता आणि धर्मगुरू होता.

श्रीमंत आणि कलाप्रिय घराण्यात जन्मल्यामुळे हर्बर्टला उत्तम शिक्षण मिळाले. हर्बर्ट कॅम्ब्रिज विद्यापीठात अधिकारी होता तसेच इंग्लिश संसदेतही त्याचे वजन होते.

हर्बर्ट धर्मगुरू होण्यासाठी ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेला. तेथे शिकत असताना हर्बर्टला भाषा आणि संगीतक्षेत्रात गती होती. इंग्लंडचा राजा जेम्स पहिल्याच्या नजरेस पडल्यावर त्याने हर्बर्टला संसदेत येण्यास प्रोत्साहन दिले. हर्बर्ट दोन वर्षे खासदार होता.