Jump to content

जॉर्ज मॅलरी

जॉर्ज मॅलरी हे एक ब्रिटिश गिर्यारोहक होते. यांनी १९२१ मध्ये एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठीच्या उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्याची होती. मॅलरी यांनी आपल्या शोधाकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडेपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. ज्यांनी ७,००७ मीटर उंचीच्या नॉर्थ कोलवर पाऊल ठेवणारी मॅलरी ही पहिली व्यक्ती होती. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले. []

पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम आखली.या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ते ८,००० मीटरपेक्षा जास्त चढाई करणारे पहिले व्यक्ती बनले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलरी यांनी पुन्हा ब्रिटिश मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना चांगल्या हवामानाची साथ मिळाली. त्यांनी विनाऑक्सिजन चढाईचे प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकॅंपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले.

१९२१ एव्हरेस्ट मोहीम: मॅलरी मागच्या रांगेत उजवीकडे

त्यानंतर १ मे १९९९ रोजी मॅलरी व आयर्विन फाऊंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली पुरले गेलेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे आयर्विन व मॅलरी यांनी एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे अगोदरच यांनी एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकाऱ्यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरून त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

  1. ^ "पहिला एव्हरेस्टवीर कोण?". kheliyad. 2020-07-20 रोजी पाहिले.