जॉर्ज बर्नार्ड शॉ
जॉर्ज बर्नार्ड शॉ | |
---|---|
जन्म नाव | जॉर्ज बर्नार्ड शॉ |
टोपणनाव | जी.बी. |
जन्म | जुलै २६, १८५६ डब्लिन, आयर्लंड |
मृत्यू | नोव्हेंबर २, १९५० हर्टफोर्डशायर, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | आयरिश |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | नाटक, कादंबरी, |
प्रसिद्ध साहित्यकृती | मिसेस वॉरन्स प्रोफेशन, पिग्मॅलियन |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९२५)[१] |
जॉर्ज बर्नार्ड शॉ (जुलै २६, १८५६:डब्लिन, आयर्लंड - नोव्हेंबर २, इ.स. १९५०:हर्टफर्डशायर, इंग्लंड) उच्चार: [] ) हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई.
श्रमिक वर्गाच्या शोषणावर त्यांना फार राग होता. एक उत्कट सोशलिस्ट, शॉ यांनी फेबियन सोसायटीसाठी अनेक पत्रिका व व्याख्याने लिहिली आहेत. या सोसायटीत दिलेल्या व्याख्यानांतून, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी महिला व पुरुष समान हक्क मिळविणे, कामगार वर्गाच्या अपेष्टा कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीच्या संपादन करणे या विषयांचा प्रचार केला आणि ते एक प्रभावी वक्ता बनले.
अल्प काळासाठी ते स्थानिक राजकारणात तसेच लंडन काउंटी परिषदेवर होते.
१८९८ मधे शॉ यांनी, शार्लोट पेन टाउनशेंड या फेबियन सहकारी स्त्रीशी लग्न केले. सेंट लॉरेन्समधील अयॉट गावात ते स्थायिक झाले, त्या घराला आता शॉझ कॉर्नर म्हणतात. ९४ वर्षांचे असताना एका शिडीवरून पडून मोठी जखम झाल्याने त्यांचा येथेच मृत्यू झाला.
जीवन
सुरुवातीची वर्षे आणि कुटुंब
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी सिंज स्ट्रीट, डब्लिन (आयर्लंड) येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज कार शॉ (१८१४–८५) एक अयशस्वी धान्य व्यापारी आणि कधीतरी मुलकी खात्यातील अधिकारी होते, आई ल्युसिंडा एलिझाबेथ शॉ, (माहेरच्या गर्ली) (१८३०-१९१३) या एक गायिका होत्या. त्यांना दोन बहिणी होत्या, संगीत नाटक गायिका ल्युसिंडा फ्रान्सिस (१८५३-१९२०), आणि एलिनोर ॲग्नेस(१८५५-७६)
शिक्षण
जॉर्ज बर्नार्ड शॉ काही काळ वेलस्ली कॉलेज डल्बीन येथे शिकले.सदर शाळा आयर्लंडच्या मेथोडिस्त चर्चद्वारे चालवले जात होते.त्यांचे औपचारिक शिक्षण डब्लिन इंग्लिश सायंनटिफिक ॲंन्ड कमर्शिअल स्कूल येथे झाले.
राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचार
लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वतःचे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्याने घडविले. संगीतावर लेख लिहून सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर तो कांदबऱ्याही लिहीत होता आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या. कमाईही फारशी नव्हती. अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळांतून तो वावरू लागला आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागला. १८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेन्री जॉर्ज ह्याच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळला आणि पुढे फेबिअन सोसायटी ह्या लंडनमधील समाजवादी संघटनेचा एक आधारस्तंभ बनला. इंग्लंडमध्ये समावाद आला पाहिजे; पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक- आर्थिक सुधारणांमधून येईल. अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती. पोथीनिष्ठ सैद्धांतिकतेपेक्षा विवेक आणि मानवतावाद ह्यांवर शॉचा अढळ विश्वास होता आणि तो त्याच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे.
कार्य
शॉच्या काळी पश्चिमी जगातील नाटककरांवर इब्सेनचा मोठा प्रभाव होता. शॉदेखील त्याचा चाहता होता. क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम (१८९१) हे त्याचे इंग्लिश भाषेतले इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. शॉ नाट्यलेखन करू लागला, त्या वेळी नाटककार म्हणून ख्याती पावलेले ⇨ आर्थर विंग पिनीरो आणि ⇨ हेन्री आथॅर जोन्स हे नाटककार आधुनिक वास्तववादी नाटके लिहिण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचा दर्जा बेताचा होता. त्यातून ब्रिटिश रंगभूमीवर निर्माण झालेली पोकळी इब्सेनची नाटके तिथे सादर होऊ लागल्यानंतर अधिकच तीव्रतेने जाणवू लागली. ती पोकळी शॉच्या नाटकांनी समर्थपणे भरून काढली. साहित्यनिर्मितीमागे सामाजिक हेतू असला पाहिजे, ही शॉची स्पष्ट भूमिका होती. प्रत्येक नाटक लिहिण्यामागचा आपला हेतू शॉने त्या त्या नाटकाला आपली प्रस्तावना जोडून स्पष्ट केला आहे. ए डॉल्स हाउससारखे इब्सेनचे नाटक शेक्सपिअरच्या मिड्समर नाइट्स ड्रीमसारखे कायम ताजे-तल्लख वाटणार नाही; पण त्या नाटकाने साधलेला सामाजिक परिणाम शेक्सपिअरच्या त्या नाटकापेक्षा मोठा असेल; आणि सर्वश्रेष्ठ प्रतिभेने तेवढे करणे पुरेसे आहे, अशा आशयाचे उद्गार र्शाने काढलेले आहेत. ह्या धारणेला अनुसरून शॉने समाजाच्या सदसद्विवेवकबुद्धीची जपणूक करण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळेच त्याचे साहित्य प्रचारकी न बनता कलात्मक पातळी गाठू शकले. कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारची एकात्मता आणि आत्मसुसंगती असते. त्यामुळे तिच्या कोणत्याही भागाचा अभ्यास करून तिच्या समग्र स्वरूपाचे आकलन होऊ शकते, असे शॉचे मत होते. ह्या समग्रतेचे जपलेले नेमके भान त्याच्या नाट्यसृष्टीतून प्रत्ययास येते. ने स्वतःला आपल्या पिढीचा सर्वश्रेष्ठ नाटककार मानले. त्याचा प्रभाव ब्रिटिश रंगभूमीवर सुमारे ५० वर्षे होता. साहित्याचा नोबेल पुरस्कार त्याला १९२५ साली देण्यात आला. शार्लट पेन-टाउनशेंड ह्या फेबिअन सोसायटीतल्याच एका संपन्न स्त्रीशी शॉचा विवाह झाला होता (१८९८). १९४३ साली ती मरण पावली. हर्टफर्डशरमधील एर सेंट लॉरेन्स या गावी रहात असताना तेथेच त्याचे निधन झाले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Nobel Prize in Literature 1925" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादित title=
ignored (सहाय्य)