जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल
जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल George Frideric Handel | |
---|---|
जन्म नाव | Georg Friedrich Händel |
जन्म | २३ फेब्रुवारी १६८५ हाले, पवित्र रोमन साम्राज्य (आजचा जर्मनी) |
मृत्यू | १४ एप्रिल, १७५९ (वय ७४) लंडन, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
संगीत प्रकार | ऑपेरा |
स्वाक्षरी |
जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल (जर्मन: Georg Friedrich Händel, गेओर्ग फ्रीडरीश ह्यांडेल; २३ फेब्रुवारी १६८५ - १४ एप्रिल १७५९) हा जर्मनीमध्ये जन्मलेला एक ब्रिटिश संगीतकार होता. जर्मनीच्या हाले शहरामध्ये जन्मलेल्या हान्डेलने हाले, हांबुर्ग व इटली येथे बरोक संगीताचे शिक्षण घेतले व इ.स. १७१७ साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. हान्डेलने त्याच्या कार्यकाळात ४२ ऑपेरा व शेकडो इतर संगीत रचना लिहिल्या.
योहान सेबास्टियन बाख व दोमेनिको स्कार्लाती ह्यांचा समकालीन राहिलेला हान्डेल बरोक संगीतामधील सर्वश्रेष्ठ रचनाकारांपैकी एक मानला जातो.