Jump to content

जॉर्ज पोकॉक

ॲडमिरल जॉर्ज पोकॉक (६ मार्च, इ.स. १७०६:सरे, इंग्लंड - ३ एप्रिल, इ.स. १७९२:कर्झन स्ट्रीट, मेफेर, लंडन, इंग्लंड) हा रॉयल नेव्हीचा आरमारी अधिकारी होता. याच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने भारताच्या किनाऱ्यावर फ्रेंचांचा पराभव केला व भारताच्या किनारपट्टीवर आपली पकड बळकट केली.

कारकीर्द

पोकॉकने इ.स. १७१८मध्ये आपली आरमारी कारकीर्द सुरू केली. आपला मामा कॅप्टन स्ट्रेनशॅम मास्टरच्या हाताखाली हा एचएमएस सुपर्ब या युद्धनौकेवर रुजू झाला.).[] एप्रिल १७२५मध्ये याला लेफ्टनंट केले गेले आणि १७३३मध्ये हा कमांडर पदावर चढला. १७३८मध्ये त्याला बढती देउन पोस्ट कॅप्टनचे पद दिले गेले आणि एचएमएस आल्डबोरो या २० तोफी युद्धनौकेची कमान त्याला दिली गेली.[] या नौकेसह हा वेस्ट इंडीजमध्ये होता. १७५४ साली याला एचएसएस कम्बरलॅंड या ५८ तोफी नौकेची कमान देउन ईस्ट इंडीजला पाठविण्यात आले. तेथे रियर ॲडमिरल चार्ल्स वॅटसनच्या दिमतीत राहून त्याने रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा पाडाव करण्यास मोठी मदत केली. १७५५मध्ये पोकॉकला रियर अडमिरल तर १७५६मध्ये व्हाइस ॲडमिरल पदांवर बढती मिळाली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Sir George Pocock at Oxford Dictionary of National Biography
  2. ^ विनफील्ड, Rif (2007). British Warships of the Age of Sail 1714–1792: Design, Construction, Careers and Fates. p. २४९.