Jump to content

जॉर्जिया

जॉर्जिया
საქართველო
Sakartvelo
जॉर्जियाचा ध्वजजॉर्जियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: ძალა ერთობაშია
(एकात्मतेमध्ये शक्ती आहे)
राष्ट्रगीत:
თავისუფლება
ताविसुप्लेबा
स्वातंत्र्य
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
त्बिलिसी
अधिकृत भाषाजॉर्जियन
इतर प्रमुख भाषा रशियन, आर्मेनियन
सरकारअर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखजियॉर्जी मार्गवेलाश्विली
 - पंतप्रधानबिद्झिना इवानिश्विली
महत्त्वपूर्ण घटना
 - रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्य२६ मे १९१८ 
 - सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य घोषणा
अंतिम
९ एप्रिल १९९१
२५ डिसेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६९,७०० किमी (१२०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४४,६९,२०० (१२१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६८.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.५४१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न५,९४१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३३ (उच्च) (७४ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनजॉर्जियन लारी
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१GE
आंतरजाल प्रत्यय.ge
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९९५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स.च्या चौथ्या शतकात दोन राजतंत्रांमधून स्थापन झालेले जॉर्जिया ११-१२व्या शतकादरम्यान आर्थिक व राजकीय दृष्ट्या एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीस रशियाने जॉर्जियावर कब्जा करून हा भूभाग आपल्या साम्राज्यामध्ये जोडला. इ.स. १९१७ मधील रशियन क्रांतीनंतर जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळाले परंतु लगेचच १९२१ साली सोव्हिएत संघाच्या लाल सैन्याने जॉर्जियावर लष्करी आक्रमण केले. पुढील ७० वर्षे जॉर्जिया सोव्हिएतच्या १५ गणराज्यांपैकी एक होते. १९९१ मधील सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर जॉर्जिया पुन्हा स्वतंत्र देश बनला. झ्वियाद गामसाखुर्दिया हा स्वतंत्र जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे जॉर्जियामध्ये सामाजिक अस्थिरतेचे वातावरण होते. २००३ साली येथे घडलेल्या क्रांतीनंतर येथे लोकशाही सरकार आहे. तेव्हापासून जॉर्जियाने झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु २००८ पासून चालू असलेल्या रशियासोबतच्या सततच्या तणावामुळे जॉर्जियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.

जॉर्जिया युरोपाच्या परिषदेचा सदस्य आहे. जॉर्जिया देशातील दोन प्रांत - दक्षिण ओसेशियाअबखाझिया हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरूव्हानुआतू ह्यांव्यतिरिक्त इतर संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

जॉर्जिया देश दक्षिण कॉकेशस भागात अत्यंत डोंगराळ प्रदेशामध्ये वसला आहे. उत्तरेस कॉकासस पर्वतरांग जोर्जियाला रशियापासून अलग करते.

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात जॉर्जिया
  • जॉर्जिया फुटबॉल संघ

बाह्य दुवे