Jump to content

जॉन फॅवरू

जॉन फॅवरू

जॉनाथन कोलिया फॅवरू (१९ ऑक्टोबर, १९६६ - ) [] हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता आहे. एक अभिनेता म्हणून त्याने रुडी (१९९३), पीसीयू (१९९४), स्विंगर्स (१९९६), व्हेरी बॅड थिंग्स (१९९८), डीप इम्पॅक्ट (१९९८), द रिप्लेसमेंट्स (२०००), डेअरडेव्हिल (२००३), द ब्रेक-अप (२००६), फोर ख्रिसमस (२००८), कपल्स रिट्रीट (२००९), आय लव्ह यू, मॅन (२००९), पीपल लाईक अस (२०१२), द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट (२०१३), शेफ (२०१४), आणि मार्वल स्टुडिओने तयार केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चित्रपट निर्माता म्हणून तो मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये लक्षणीयरित्या सामील आहे. त्याने आयर्न मॅन (२००८) आणि आयर्न मॅन २ (२०१०) या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली तसेच या चित्रपटांमध्ये हॅप्पी होगनच्या भूमिकेत तो दिसला. द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), स्पायडर-मॅन: होमकमिंग (२०१७), ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९), आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) या चित्रपटांसाठी त्याने कार्यकारी निर्माता म्हणून किंवा त्यात पात्र म्हणून काम केले.

त्याने एल्फ (२००३), झथुरा: ए स्पेस अॅडव्हेंचर (२००५), काउबॉय अँड एलियन्स (२०११), शेफ (२०१४), द जंगल बुक (२०१६), आणि द लायन किंग (२०१९) या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. जोनाथन हा स्टार वार्स डिझ्नी+ मूळ मालिका द मेंडालोरियन (२०१९–चालू) चा निर्माता, कार्यकारी निर्माता आणि दिग्दर्शक आहे. द बुक ऑफ बॉबा फेट या स्पिन-ऑफ मालिकेसाठी तो लेखक आणि कार्यकारी निर्माता म्हणूनही काम करतो. तो फेअरव्ह्यू एंटरटेनमेंट या त्याच्या निर्मिती कंपनीद्वारे चित्रपटांची निर्मिती करतो आणि द शेफ शो ही दूरचित्रवाणी मालिका देखील सादर करतो.

संदर्भ

  1. ^ "George Lucas visits set of 'Star Wars' live-action series 'The Mandalorian'". Entertainment Weekly (इंग्रजी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.