Jump to content

जॉन डी. रॉकफेलर पहिला

जॉन डेव्हिसन रॉकफेलर (जुलै ८, इ.स. १८३९ - मे २३, इ.स. १९३७) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानकर्ता होता. याने स्टॅंडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली व त्याद्वारे अमेरिकेतील खनिज तेल उद्योगावर प्रभुत्व गाजवले. रॉकफेलरने आपल्या संपत्तीचे ट्रस्ट[मराठी शब्द सुचवा] केले व त्याद्वारे अमाप पैसा दान केला.

रॉकफेलरने स्टॅंडर्ड ऑइलची स्थापना ओहायोमध्ये आपला भाऊ विल्यम रॉकफेलर, हेन्री फ्लॅगलर, जेबेझ बॉस्टविक, सॅम्युएल अँड्रुझ आणि स्टीवन व्ही. हार्कनेस यांच्या भागीतारीत सुरू केली. जसजसे केरोसीनपेट्रोलचे भाव जगभर वाढत गेले तसतशी रॉकफेलरची मिळकतही. लवकरच तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. यावळी त्याची इस्टेत १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. चलनवाढ लक्षात घेता हा जगाच्या इतिहासातील सगळ्यात श्रीमंत माणूस ठरतो.[][][][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Richest Americans". Fortune. CNN. 2007-07-17. May 6, 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Top 10 Richest Men of All Time". AskMen.com. 2007-05-29 रोजी पाहिले.
  3. ^ "The Rockefellers". PBS. 2012-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-05-29 रोजी पाहिले.
  4. ^ "The Wealthiest Americans Ever". The New York Times. July 15, 2007. 2007-07-17 रोजी पाहिले.