जॉन टायलर
जॉन टायलर | |
सही |
---|
जॉन टायलर (इंग्लिश: John Tyler ;) (मार्च २९, इ.स. १७९०; चार्ल्स सिटी काउंटी, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने – जानेवारी १८, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ एप्रिल, इ.स. १८४१ ते ४ मार्च, इ.स. १८४५ या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले.
डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाकडून दीर्घकाळ राजकारण केलेला टायलर इ.स. १८४१ साली व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहून उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. मात्र ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी नववा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याच्या अवघ्या एका महिन्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीनंतर झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे राजकीय पेचप्रसंग उद्भवला. ६ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी टायलराने अध्यक्षपदाची शपथ घेतली. या घटनेतून अध्यक्षीय उत्तराधिकारी निवडण्याचा संकेत अमेरिकी राजकारणात रूढ झाला व त्यातूनच पुढे अमेरिकी राज्यघटनेतील पंचविसावी घटनादुरुस्ती करण्यात आली. टायलराच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १८४५ साली टेक्सासाच्या प्रजासत्ताकाचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सामिलीकरण घडले.
व्हिग पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या टायलराने अध्यक्षीय कारकिर्दीत मात्र व्हिग पक्षाने पुरस्कारलेल्या अनेक धोरणांना, योजनांना नकाराधिकार वापरत विरोध केला. त्यामुळे त्याच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले; तसेच व्हिग पक्षातून त्याला काढून टाकण्यात आले.
बाह्य दुवे
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत अल्पचरित्र" (इंग्लिश भाषेत). 2009-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "जॉन टायलर याचा अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत). 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "जॉन टायलर याचे किंवा याच्याबद्दल प्रकाशित साहित्य" (इंग्लिश भाषेत). 2011-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)