जॉन अॅडम्स
जॉन अॅडम्स | |
कार्यकाळ ४ मार्च १७९७ – ४ मार्च १८०१ | |
मागील | जॉर्ज वॉशिंग्टन |
---|---|
पुढील | थॉमस जेफरसन |
जन्म | ३० ऑक्टोबर १७३५ बॉस्टन, मॅसेच्युसेट्स |
मृत्यू | ४ जुलै, १८२६ (वय ९०) बॉस्टन, मॅसेच्युसेट्स |
सही |
जॉन अॅडम्स (इंग्लिश: John Adams) (३० ऑक्टोबर, इ.स. १७३५ - ४ जुलै, इ.स. १८२६) हा अमेरिकन राजकारणी व राजकीय तत्त्वज्ञ होता. ४ मार्च, १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात तो अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. जॉर्ज वॉशिंग्टनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २१ एप्रिल, इ.स. १७८९ ते ४ मार्च, इ.स. १७९७ या काळात तो नवनिर्मित देशाचा पहिला उपराष्ट्राध्यक्ष होता. न्यू इंग्लंड येथून आलेला अॅडम्स हा बॉस्टन शहरातील नामवंत वकील होता. खंडीय कॉंग्रेशीत मॅसेच्युसेट्स संस्थानाचे प्रतिनिधित्व केलेल्या अॅडम्साने इ.स. १७७६ सालचा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यास थॉमस जेफरसनास साहाय्य केले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील जॉन अॅडम्स याचे अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- अमेरिकनप्रेसिडेंट्स. कॉम या संकेतस्थळावरील जॉन अॅडम्स याच्याविषयीची माहिती, भाषणे, चित्रे, अवतरणे (इंग्लिश मजकूर)