Jump to content

जॉन अपडाइक

जॉन अपडाइक

जॉन अपडाइक (इंग्लिश: John Updike ;) (मार्च १८, इ.स. १९३२ - जानेवारी २७, इ.स. २००९) हा इंग्लिश भाषेतील अमेरिकन कादंबरीकार, लघुकथाकार, कवी, साहित्यसमीक्षक व कलासमीक्षक होता. 'हॅरी "रॅबिट" ॲंगस्ट्रॉम' या काल्पनिक व्यक्तिरेखेस घेऊन याने लिहिलेल्या 'रॅबिट, रन', 'रॅबिट रिडक्स', 'रॅबिट इज रिच', 'रॅबिट अ‍ॅट रेस्ट' आणि 'रॅबिट रिमेंबर्ड' या पाच कादंबऱ्यांची 'रॅबिट' कादंबरी मालिका विशेष ख्यात आहे. इ.स. १९८१ साली रॅबिट इज रिच या कादंबरीबद्दल, तर इ.स. १९९० साली रॅबिट अ‍ॅट रेस्ट या कादंबरीबद्दल त्याला पुलित्झर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे

  • "जॉन अपडाइक संकलन, हॉटन ग्रंथालय, हार्वर्ड विद्यापीठ (इंग्रजी मजकूर)".