Jump to content

जॉझिया जॉन गुडविन

जॉझिया जॉन गुडविन (२० सप्टेंबर, १८७०:बाथिएस्टन, इंग्लंड - २ जून, १८९८:उदगमंडलम, भारत) हे एक लघुलेखक आणि संपादक होते. हे स्वामी विवेकानंदांचे लिपिक आणि शिष्य होते, विवेकानंदांचेचे विश्वप्रसिद्ध भाषण उतरवून काढण्याचे श्रेय गुडविन यांना जाते. गुडविन यांनी आपल्या अनेक भाषांमध्ये लिहिलेल्या पत्रासह, स्वामीजींचे भाषण देखील लिहिले.

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या गुडविन यांनी १८९३मध्ये ऑस्ट्रेलियाला व नंतर अमेरिकेला स्थलांतर केले.

विवेकानंद अमेरिकेत असताना त्यांच्या बोलण्याच्या वेगाला साथ देउन ते लिहून काढणारा लिपिक त्यांना मिळत नव्हता तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांना गुडविन यांचे नाव सुचवले. गुडविन दर मिनिटाला २०० शब्द ९९ टक्के अचूकतेने लिहून काढीत असत. त्यावेळी गुडविन कोर्टात काम करीत व त्यांच्या सेवेचा दर महाग होता. एक आठवडा विवेकानंदांची भाषणे व स्वगते लिहून काढताना गुडविन त्यांच्यापासून प्रभावित झाले व त्यांचे शिष्य झाले. त्यानंतर त्यांनी आपली सेवा विनामूल्य दिली.[]

जानेवारी १८९७मध्ये ते विवेकानंदांबरोबर कोलकात्याला आले. ब्रह्मवाणी या नियतकालिकाच्या प्रकाशनात त्यांनी योगदान दिले.

मद्रास (आताचे चेन्नई)चे उष्णता हवामान न सोसल्या ते उदगमंडलम येथे गेले. तेथेच वयाच्या २७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Vrajaprana 1999, p. i मधील प्रकाशकाची नोंद, पृ.११