जॉक कार्तिये
जॉक कार्तिये | |
---|---|
जन्म | ३१ डिसेंबर, इ.स. १४९१ सेंत मालो, ब्रत्तान्य |
मृत्यू | १ सप्टेंबर, इ.स. १५५७ सेंत मालो, ब्रत्तान्य |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
प्रसिद्ध कामे | उत्तर अमेरिका व कॅनडाला पोचलेला पहिला युरोपीय |
स्वाक्षरी |
जॉक कार्तिये (फ्रेंच: Jacques Cartier; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक फ्रेंच खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील कॅनडापर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. इ.स. १५३४ साली कार्तिये सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या क्वेबेक सिटी व मॉंत्रियाल येथील स्थानिक इरुक्वाय लोकांच्या वसाहती शोधून काढल्या.
कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वाऱ्या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले.