जे डिमेरिट
जे मायकेल डिमेरिट (४ डिसेंबर, १९७९:ग्रीन बे, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
डिमेरिटने इंग्लंडमध्ये नवव्या स्तरावर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. तेथून त्याने प्रीमियर लीग आणि फिफा विश्वचषकांपर्यंत प्रगती केली. या प्रवासाचे वर्णन राइझ अँड शाइन: द जे डिमेरिट स्टोरी या चित्रपटात केले गेले आहे.