Jump to content

जे.के. रोलिंग

जे.के. रोलिंग
जे.के. रोलिंग
जन्म नाव जोआन रोलिंग
जन्म ३१ जुलै, १९६५ (1965-07-31) (वय: ५९)
येट, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड
राष्ट्रीयत्वFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृतीहॅरी पॉटर
वडील पीटर
आई अ‍ॅन्
पती नील मुर्हे
अपत्ये २ मुली, १ मुलगा
पुरस्कार ऑथर ऑफ द इयर(२०००) ब्रिटिश बुक्स
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

जोआन रोलिंग (लेखननाम: जे.के. रोलिंग ; इंग्लिश: J. K. Rowling ;) (जुलै ३१, इ.स. १९६५; येट, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - हयात) ही एक ब्रिटिश लेखिका आहे. तिने निर्मिलेली हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंब‍र्यांची मालिका इंग्लिश साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मॅंचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हणले जाते. हॅरी पॉटर पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या जवळपास ४० कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत, तसेच त्यावर आधारित चित्रपटदेखील लोकप्रिय ठरले आहेत.

रोलिंग हिच्या पुस्तकांइतकीच तिची जीवनकहाणीदेखील लोकांना रोमांचकारक वाटते. हॅरी पॉटर पुस्तकांच्या तडाखेबंद खपामुळे अवघ्या पाच वर्षांत ती लखपती बनली. मार्च इ.स. २०१० सालातल्या फोर्बसच्या कोट्यधीशांच्या यादीत जे.के. रोलिंगला स्थान देताना त्यांनी तिची संपत्ती १ अब्ज अमेरिकन डॉलरांइतकी असल्याचे नमूद केले आहे. इ.स. २००७ साली फोर्ब्स प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या नामावळीत रोलिंग ही अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर होती. इ.स. २००७ सालच्या टाइम नियतकालिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर' नामांकनात जे.के. रोलिंग दुसऱ्या स्थानी होती. ऑक्टोबर इ.स. २०१०मध्ये, ब्रिटनातील काही प्रमुख नियतकालिकांच्या संपादकांनी रोलिंग हिला 'ब्रिटनातील सर्वांत प्रभावशाली महिला' म्हणून गौरवले. एकच पालक असलेल्या कुटुंबांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, मल्टिपल स्क्लेरॉसिस सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अशा अनेक समाजसेवी संस्थांसाठी तिने योगदान दिले आहे.

जे.के. रोलिंग यांच्या विषयीची पुस्तके

  • जे.के. रोलिंग (चरित्र, लेखिका - पूनम छत्रे)
  • जेके. रोलिंग एक मोटि्वेशन स्टोरी (इंग्रजी, हिंदी)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जे.के. रोलिंग चे पान (इंग्लिश मजकूर)