Jump to content

जेसी व्हेंचुरा

जेसी व्हेंचुरा तथा जेम्स जॉर्ज जानोस (१५ जुलै, १९५१:मिनीयापोलिस, मिनेसोटा, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी, अभिनेता आणि व्यावसायिक पैलवान आहे. हे मिनेसोटाचे ३८वे गव्हर्नर होते.

व्हेंचुरा व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेच्या आरामारात पाण्याखाली विध्वंस करणाऱ्या तुकडीमध्ये होते. [] आरमारातून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी व्यावसायिक कुस्ती करणे सुरू केले व त्यासाठी स्वतःला "जेसी 'द बॉडी' व्हेंचुरा" असे नाव घेतले. त्यांनी हे १९७५-८६ दरम्यान केले[] याच बरोबर व्हेंचुराने चित्रपटांतून अभिनयही केला. त्यांनी १९८७ च्या प्रिडेटर आणि द रनिंग मॅन या दोन चित्रपटांमध्ये आर्नोल्ड श्वार्झनेगर बरोबर काम केले होते. श्वार्झनेगर कालांतराने कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर झाले.

१९८२मध्ये व्हेंचुरा
२००० मध्ये मिनेसोटा प्रतिनिधीगृहात भाषण देताना

संदर्भ

साचा:Governors of Minnesota

  1. ^ "More than Military". MilitaryHub.com. December 24, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 15, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "OWOW profile". Online World of Wrestling. December 29, 2012 रोजी पाहिले.