जेसी ओवेन्स
जेम्स क्लीव्हलँड " जेसी " ओवेन्स (१२ सप्टेंबर, १९१३ – ३१ मार्च, १९८०) हे एक अमेरिकन खेळाडू होते.. यांनी १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली होती. [१]
बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये १०० मीटर धाव, २०० मीटर धाव आणि ४×१०० मीटर रिले तसेच लांब उडी मध्ये सुवर्णपदके जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. ओवेन्स या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळविणाे खेळाडू होते. एक कृष्णवर्णीय अमेरिकन माणसाने ही कामगिरी करून दाखवून, " हिटलरच्या आर्यन वर्चस्वाचे मिथक चिरडून टाकण्याचे" श्रेय त्यांना एकहाती दिले जाते. [२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Treasure Trove: A Collection of ICSE Poems and Short Stories. Darya Ganj, New Delhi, India: Evergreen Publications Ltd. 2020. p. 103. ISBN 978-9350637005.
- ^ Schwartz, Larry (2000). "Owens Pierced a Myth". ESPN Internet Ventures. July 6, 2000 रोजी मूळ पान पासून संग्रहित.