जेम्स स्मिथसन
जेम्स स्मिथसन (जन्मनाव:जाक लुई मेसी; १७६५:पॅरिस, फ्रांस - २७ जून, १८२९:जेनोआ, सार्डिनिया) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रज्ञ होते. यांनी कॅलेमाइन या खनिजाचा शोध लावला. कॅलेमाइनला नंतर स्मिथसोनाइट नाव दिले गेले.
स्मिथसन यांनी मृत्युपश्चात दिलेल्या ५,००,००० अमेरिकन डॉलरच्या देणगीने स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली.