जेम्स सी. पेनी
जेम्स कॅश पेनी, जुनियर (सप्टेंबर १६, इ.स. १८७५ - फेब्रुवारी १२, इ.स. १९७१) हा अमेरिकेतील व्यापारी होता. याने १९०२ साली जे.सी. पेनी या दुकानांच्या मालिकेची स्थापना केली.
पेनीने आपल्या दुकानांतून विकलेला माल गिऱ्हाईकास पसंत न पडल्यास कोणतेही प्रश्न न विचारता परत घेण्याची व पैसे परत करण्याची परंपरा सर्वप्रथम सुरू केली.