जेम्स मॅकइन्टॉश
जेम्स मॅकिन्टॉश (२४ ऑक्टोबर, इ.स. १७६५ – ३० मे, इ.स. १८३२) त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (नंतरचे मुंबईचे सुप्रिम कोर्ट व आताचे हाय कोर्ट) मुख्य न्यायाधीश होते.
कार्य
मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव्हीच्या लायन गेट कडे जातो. या रस्त्यावर आपले जुनेपण जपणारी भव्य इमारत आहे. ही इमारत अजूनही तिच्या 'टाऊन हॉल' या जुन्याच नावाने ओळखली. जाते. या इमारतीत मुंबईच्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचे वाचनालय आहे. ही सोसायटी इ.स. १८०४ मध्ये सर जेम्स मॅकइन्टॉश यांनी स्थापन केली होती.
ऐतिहासिक घटना
इ.स. १८०५मध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पुणे दरबारी असलेले ब्रिटिश रेसिडेंट कर्नल क्लोज यांच्या निमंत्रणावरून मॅकिनटॉश यांनी पुण्याला अधिकृत भेट दिली होती. कंपनी सरकारच्या एका बड्या अधिकाऱ्याची ही अधिकृत भेट असल्याने सर्व औपचारिकता पाळण्यात आली होती.