Jump to content

जेम्स मनरो

जेम्स मनरो

सही जेम्स मनरोयांची सही

जेम्स मनरो (अन्य लेखनभेद: जेम्स मन्‍रो; इंग्लिश: James Monroe ;) (२८ एप्रिल, इ.स. १७५८ - ४ जुलै, इ.स. १८३१) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८१७ ते ४ मार्च, इ.स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तसेच व्हर्जिनिया घराण्यातील शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर पक्षीय भेद निवळलेले राहिले; मात्र कारकिर्दीच्या उत्तरकाळात इ.स. १८१९ सालाच्या सुमारास मंदी व नंतर मिसूरी प्रदेशाच्या सामिलीकरणावरून राष्ट्रव्यापी वादंग, असे दोन पेचप्रसंग उद्भवले.

बाह्य दुवे