जेम्स ब्रेड टेलर
जेम्स ब्रेड टेलर (एप्रिल २१, १८९१ - फेब्रुवारी १७, १९४३) हे भारतीय रिझर्व बँकेचे दुसरे गव्हर्नर होते. जरी सर ओस्बॉर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते तरी भारतीय नोटांवर स्वाक्षरी करण्याचा पहिला मान जेम्स ब्रेड टेलर यांना मिळाला.
जेम्स ब्रेड टेलर हे सनदी अधिकारी होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३५ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते अर्थ मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चांदीची टंचाई जाणवू लागल्याने टेलर यांच्या काळात वापरात असलेली चांदीची नाणी बंद करण्यात आली आणि त्याऐवजी इतर हलक्या धातुंची नाणी चलनात आली.
जेम्स ब्रेड टेलर गव्हर्नर पदावर असतांनाच दि. फेब्रुवारी १७, इ.स. १९४३ रोजी त्यांचे निधन झाले.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.
मागील: सर ओस्बॉर्न स्मिथ | रिझर्व बँकेचे गव्हर्नर जुलै १, १९३७ – फेब्रुवारी १७, १९४३ | पुढील: सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख |