Jump to content

जेम्स ब्यूकॅनन

जेम्स ब्यूकॅनन

सही जेम्स ब्यूकॅननयांची सही

जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स. १७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. अँड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले.

गुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2008-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "जेम्स ब्यूकॅनन: अ रिसोर्स गाइड (जेम्स ब्यूकॅनन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)