जेम्स फर्ग्युसन
जेम्स फर्ग्युसन | |
---|---|
जन्म | मार्च १४, इ.स. १८३२ एडिंबरा, युनायटेड किंग्डम |
मृत्यू | १४ जानेवारी, इ.स. १९०७ |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
सर जेम्स फर्गसन हे इ.स. १८८५ला मुंबईचे गव्हर्नर होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी या सार्वजनिक संस्थेचे जेम्स फर्गसन हे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले.