Jump to content

जेबे

चंगीझ खानाचा विश्वासू सरदार. त्याच्या शौर्याचा गौरव म्हणून चंगीझने त्याला 'जेबे' हे नाव दिल्याचे सांगितले जाते. जेबे या मंगोल शब्दाचा अर्थ "तीक्ष्ण तीर" असा होतो.

चंगीझने केलेल्या अनेक स्वाऱ्यांत त्याचा सहभाग होता. त्याच्या अधिपत्याखाली कारा-खितान व पूर्व युरोपावर स्वारी करण्यात आली. गनिमी काव्याने लढण्यात तो पटाईत समजला जाई.