जेन फोंडा
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री. Jane Fonda at the Cannes Film Festival in 2014. | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Jane Fonda |
---|---|
जन्म तारीख | डिसेंबर २१, इ.स. १९३७ न्यू यॉर्क सिटी Jane Seymour Fonda |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
सदस्यता |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
मातृभाषा | |
वडील |
|
आई |
|
भावंडे |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
सहचर |
|
पुरस्कार |
|
अधिकृत संकेतस्थळ | |
जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर १९३७) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. चित्रपट जगतात एक प्रतीक म्हणून ओळखली जाणाऱ्या फोंडाचे कार्य अनेक शैलींमध्ये आणि चित्रपट आणि दूरचित्रवाणी मध्ये सहा दशकांहून अधिक काळ पसरलेले आहे.[१] दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट (बाफ्टा) पुरस्कार, सात गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, एफआय लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार, मानद पाल्म डी'ओर आणि सेसिल बी. डेमिल पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांची ती प्राप्तकर्ता आहे.[२]
सोशलाइट फ्रान्सिस फोर्ड सेमोर आणि अभिनेता हेन्री फोंडा यांच्या पोटी जन्मलेल्या, फोंडाने १९६० च्या ब्रॉडवे नाटक देअर वॉज अ लिटल गर्ल मधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी नंतर रोमँटिक कॉमेडी टॉल स्टोरी मधून तिने स्क्रीनवर पदार्पण केले. १९६० च्या दशकात तिला ऑस्कर नामांकन मिळण्यापूर्वी पीरियड ऑफ ॲडजस्टमेंट (१९६२), संडे इन न्यू यॉर्क (१९६३), कॅट बॉलू (१९६५), बेअरफूट इन द पार्क (१९६७) आणि बारबरेला (१९६८) या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली. दे शूट हॉर्सेस, डोंट दे? (१९६९) चित्रपटातील कामगिरीसाथी तिला ऑस्कर नामांकन मिळले.[३] त्यानंतर फोंडाने १९७० च्या दशकात क्लूट (१९७१)[४] आणि कमिंग होम (१९७८)[५] साठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकून, तिच्या पिढीतील सर्वात प्रशंसित अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्युलिया (१९७७),[६] द चायना सिंड्रोम (१९७९),[७] ऑन गोल्डन पॉन्ड (१९८१),[८] आणि द मॉर्निंग आफ्टर (१९८६)[९] साठी तिचे इतर नामांकन आहेत. फन विथ डिक अँड जेन (१९७७), कॅलिफोर्निया सूट (१९७८), द इलेक्ट्रिक हॉर्समन (१९७९), आणि ९ टू ५ (१९८०) या सलग हिट चित्रपटांनी फोंडाचा बॉक्स ऑफिसवरील जम कायम ठेवला. दूरदर्शन चित्रपट द डॉलमेकर (१९८४) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१०]
१९८२ मध्ये, फोंडाने तिचा पहिला व्यायामाचा व्हिडिओ, "जेन फोंडाज वर्कआउट" प्रकाशित केला, जो त्याच्या काळातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ टेप बनला. पुढील १३ वर्षांतील अशा २२ व्हिडिओंपैकी हा पहिला होता, ज्याच्या एकत्रितपणे १७ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या.[११] स्टॅन्ली ॲन्ड आयरीस (१९९०) मध्ये अभिनय केल्यानंतर, फोंडाने अभिनयातून एक विराम घेतला आणि कॉमेडी मॉन्स्टर-इन-लॉ (२००५) सह अभिनयाकडे परतली. ३३ व्हेरिएशन्स (२००९) या नाटकातही ती ब्रॉडवेवर परतली, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्काराचे नामांकना मिळवले. त्यानंतर तिने युथ (२०१५) आणि अवर सोल्स ॲट नाईट (२०१७) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये आणि नेटफ्लिक्सच्या ग्रेस अँड फ्रँकी (२०१५-२०२२) या कॉमेडी मालिकेत काम केले आहे. ह्या मालिकेसाठी तिने उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे.
व्हियेतनाम युद्धादरम्यान काउंटरकल्चर युगात फोंडा ही राजकीय कार्यकर्ता होती. १९७२ च्या हनोईच्या भेटीवर उत्तर व्हिएतनामी विमानविरोधी तोफेवर बसलेले तिचे छायाचित्र काढण्यात आले होते, ज्या दरम्यान तिला "हनोई जेन" हे टोपणनाव मिळाले. या काळात तिला हॉलिवूडमध्ये प्रभावीपणे बहिष्कृत यादीत टाकण्यात आले. तिने इराक युद्ध आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि स्वतःचे स्त्रीवादी आणि पर्यावरण कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.[१२] २००५ मध्ये, रॉबिन मॉर्गन आणि ग्लोरिया स्टाइनम यांच्यासमवेत, तिने वुमेन्स मीडिया सेंटरची सह-स्थापना केली. ही संस्था वकिली, मीडिया आणि नेतृत्व प्रशिक्षण आणि मूळ सामग्रीच्या निर्मितीद्वारे मीडियामधील महिलांचा आवाज वाढवण्याचे काम करते. फोंडा संस्थेच्या संचालक मंडळावर काम करते. लॉस एंजेलिसमध्ये आधारित, ती फ्रान्समध्ये सहा वर्षे आणि अटलांटामध्ये २० वर्षांसह जगभरात राहिली आहे.
वैयक्तिक जीवन
फोंडाने १४ ऑगस्ट १९६५ रोजी तिचा पहिला पती, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉजर व्हादिम याच्याशी विवाह केला.[१३] या जोडप्याला एक मुलगी होती, व्हेनेसा वॅडिम, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९६८ रोजी झाला आणि तिचे नाव अभिनेत्री आणि कार्यकर्त्या व्हेनेसा रेडग्रेव्ह यांच्या नावावर ठेवण्यात आले.[१४][१५]
१९ जानेवारी १९७३ रोजी, वदिमपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन दिवसांनी, फोंडाने कार्यकर्ता टॉम हेडनशी लग्न केले.[१६][१७] आधिच्या उन्हाळ्यात ती हेडनसोबत गुंतली होती आणि लग्न होतेवेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती.[१८] त्यांचा मुलगा, ट्रॉय ओ'डोनोव्हन गॅरिटीचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. फोंडा आणि हेडन यांनी अनधिकृतपणे एक आफ्रिकन-अमेरिकन किशोरी मेरी लुआना विल्यम्सला दत्तक घेतली.[१९] फोंडा आणि हेडनने १० जून १९९० रोजी घटस्फोट घेतला.[२०] फोंडाने तिचे तिसरे पती, केबल दूरचित्रवाणी टायकून आणि सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांच्याशी २१ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केले. हे जोडपे २००० मध्ये वेगळे झाले आणि २२ मे २००१ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१][२२]
संदर्भ
- ^ Goldwert, Lindsay (September 14, 2010). "Jane Fonda is back in her leotard, at 72; iconic actress and fitness guru to debut new fitness DVDs". New York Daily News. March 28, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 23, 2013 रोजी पाहिले.
- ^ Jane Fonda and Robert Redford Golden Lions in Venice She is part of the Fonda acting family. Archived January 15, 2018, at the Wayback Machine.. labiennale.org
- ^ "The 42nd Academy Awards (1970) Nominees and Winners". oscars.org. 2014-12-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-01-11 रोजी पाहिले.
- ^ "The 44th Academy Awards (1972) Nominees and Winners". oscars.org. 2014-11-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-12-06 रोजी पाहिले.
- ^ "The 51st Academy Awards (1979) Nominees and Winners". Academy of Motion Picture Arts and Sciences (AMPAS). 2020-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 31, 2011 रोजी पाहिले.
- ^ "The 50th Academy Awards (1978) Nominees and Winners". oscars.org. 2014-11-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-10-05 रोजी पाहिले.
- ^ "The 52nd Academy Awards (1980) Nominees and Winners". oscars.org. 2014-11-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-10-07 रोजी पाहिले.
- ^ "The 54th Academy Awards (1982) Nominees and Winners". oscars.org. 2014-11-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-10-08 रोजी पाहिले.
- ^ "The 59th Academy Awards (1987) Nominees and Winners". Academy of Motion Picture Arts and Sciences. AMPAS. November 9, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 16, 2011 रोजी पाहिले.
- ^ "36th Primetime Emmys Nominees and Winners – Outstanding Single Performance by an Actress in a Leading Role". Emmys.com. Academy of Television Arts & Sciences. 7 June 2016 रोजी पाहिले.
- ^ "Work Out with Jane Fonda, No VHS Required". Shape Magazine. December 29, 2014. November 25, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 5, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Interview". WNYC Radio FM. NPR. November 1, 2019.
- ^ "Jane Fonda Marries Frenchman". The Miami News. August 14, 1965.[मृत दुवा]
- ^ "Jane Fonda Denies Story of Divorce". The Morning Call, March 18, 1970.
- ^ Mary Campbell (August 6, 1972) Jane Fonda: 'An Actress With Revolutionary Politics' Archived October 29, 2020, at the Wayback Machine. The Leaf-Chronicle.
- ^ "Fonda Gets Divorce". The Palm Beach Post. January 18, 1973.[मृत दुवा]
- ^ "Jane Fonda Weds Chicago 7 Member". Gadsden Times. January 22, 1973. October 29, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 26, 2020 रोजी पाहिले.
- ^ Blaine T. Browne, Robert C. Cottrell (2015). Modern American Lives. Taylor & Francis Group. p. 175. ISBN 9780765629104.
- ^ Tyrangiel, Josh (April 2, 2005). "Being Jane". TIME. April 6, 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 24, 2010 रोजी पाहिले.
- ^ "Star Tracks". People. July 2, 1990. October 13, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Ted Turner, Jane Fonda Tie Knot". Observer-Reporter. December 22, 1991. October 29, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 26, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Judge Approves Fonda Divorce". ABC News. May 22, 2001. May 25, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 25, 2018 रोजी पाहिले.