Jump to content

जेनेरिक औषधे

जेनेरिक औषधे (प्रजातीय औषधे) म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रॅंडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात. त्याच्या लेबल वर ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आणि त्या औषधाचे नाव लिहिलेले असते. त्यामध्ये ब्रॅंड नाव असलेल्या औषधामध्ये असलेला ड्रग असला पाहिजे. त्याच्या फार्माकोडायनामिक आणि फार्माकोकायनेटिक गुणधर्म ब्रॅंडेड औषधासारखेच असायला हवेत.

भारत सरकारच्या रासायनिक आणि खत मंत्रालयाने सामान्य माणसांमध्ये जेनेरिक औषधांबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे[]. जेनेरिक औषधे दवाखान्यातील निम्मा खर्च कमी करते

संदर्भ आणि नोंदी