Jump to content

जेकब झुमा

जेकब झुमा

दक्षिण आफ्रिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
९ मे २००९
मागील क्गालेमा मोटलांठे

कार्यकाळ
१८ डिसेंबर, २००७ – १५ फेब्रुवारी, २०१८
मागील कगालेमा मोटलांथे
पुढील सिरिल रामफोसा

जन्म १२ एप्रिल, १९४२ (1942-04-12) (वय: ८२)
न्कांडला, क्वाझुलू-नाताल
राजकीय पक्ष आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस
धर्म प्रोटेस्टंट
ब्रिक्‍स देशांचे सरकारप्रमुख १५ नोव्हेंबर इ.स. २०१४ रोजी ब्रिस्बेन येथील जी-२० शिखर परिषदेदरम्यान

जेकब झुमा (रोमन लिपी: Jacob Zuma) (१२ एप्रिल, इ.स. १९४२ - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एप्रिल इ.स. २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत विजय मिळवून झुमा पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.

झुमा हे आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. याआधी इ.स. १९९९ - इ.स. २००५ दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. इ.स. २००५ साली बलात्कार केल्याच्या आरोपावरून झुमा ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, पण नंतर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करण्याबद्दल अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यांचा पाठपुरावा झाल्यावर झुमा यांनी १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

झुमा ह्यांनी आजवर ४ लग्ने केली असून त्यांना एकूण १८ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये, न्यायाने याकूब झुमाला 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या संकेतस्थळावरील झुमा यांचे चरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)